समुद्र आणि त्याचा किनारा

​समुद्र आणि त्याच्या किनार्याची गोष्टच जरा वेगळी असते. आयुषभर एकमेकांच्या संगतित असतात पण सोबत कधीच नसतात.  दोघाना घर नसतं. माती किनार्याला धरुन ठेवत नाही, कारण किनारा समुद्राच्या संगतित राहून खारा झालेला असतो. आणि समुद्राचा ठाव आजपर्यंत कोण लावू शकलं आहे! त्यांना एकमेकांचा सहारा असतो इतके मात्र खरे. 

कधी कधी किनार्याचे खूप वाइट वाटत. एकच सहारा अणि त्याचा पण प्रत्येक क्षणी वेगळाच चेहरा दिसतो. कधी शांत, शीतल, ज्याची सोबत असेल तर आपण माणसंपण मंत्रमुकद्ध होतो आणि दुसरा इतका खवळलेला, की त्याच्या आठवणीत रामलेल्या किनार्याचापण थारकप उडतो. 

इतक सगळ असूनही समुद्राच्या काही लाटा किनारा कधीच सोडत नाही. किनार्याला समुद्राच्या ओलव्याची आठवण करुंन देण्यासाठी. समुद्रालाही कदाचित वाटत असावा, आपल्याला नेहमी साथ देणाऱ्या किनार्याला कधीही एकट वाटू नये. पण समुद्रालाही माहित असत, आपण फक्त आलावा देऊ शकतो, कायम तिथे नाही राहु शकतं. 

– मंजिरी बोराटे

Advertisements