Sunset

In city, you seldom get to enjoy the beauty of nature. But when you do, it’s out of this world.

Advertisements

मनातलं अवकाश

​सुनिता देशपांडे ह्यांच ‘मनातलं अवकाश’ हे पुस्तक वाचल्यापासून, कदाचित मला माझ्या मनातल्या अवकशाची जाणिव झाली आहे. दिवसतून एकदातरी विचारांच्या अवकाशयानाला इंधन मिळतचं, आणि काही करायच्या आत ते अवकाशात पोहचतं. तिथून बाहेर पड़णं खूपदा अवघड असतं, कारण जस जग विज्ञानाच्या नियमांनी बांधलेलं असतं, तस मनाच्या अवकाशाला बांधणारा कोणताच नियम नाही आहे.

हे अवकाश खूप मोठ असतच पण, आपलाच भाग असुनदेखील, किंबहुना आपणच तयार केल असुनदेखील, आपल्यालाच त्याची व्याप्ती माहित नसते! कितेकदा आपण एका ठिकाणी जाऊन आलो आहोत, हे देखील आपल्या लक्षात नसतं. जर आपण तयार केलेल्या अवकाशाचा आपल्यालाच ठावठिकाणा नसेल, तर तो दूसऱ्याला तरी कसा लागेल?

जगात जितकी मनं, तेवढे अवकाश! कोणाच्या अवकाशात काय चालल आहे, हे कळणं केवळ अशक्य.. आणि कदाचित तेच बरं आहे, कारण जरं आपल्याला कळलं असतं दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे, तर आयुषातल्या बऱ्याच चांगल्या क्षणांना आपण मुकलो असतो. आपल्याला माहितदेखील नसतं आणि आपण कोणाच्या तरी अवकाशात मुक्काम केलेला असतो. आणि बऱ्याचदा ज्यांच्या अवकाशत आपलं खास स्थान आहे असं आपल्याला वाटत असतं, त्यांच्या खिजगणतीत देखील आपण नसतो! 

ह्या न दिसणाऱ्या जगात जे काही घड़तं, त्या प्रत्येक गोष्टिचा आपल्यावर खोलवर परिणाम होत असतो. कदाचित बाह्य जगतलं आपल स्वरुप, हे मनातलं अवकाशच ठरावतं. आपल्या क्रिया व प्रतिक्रिया हे अवकाशचं ठरावतं. जे जे मनाला महत्वाचं वाटतं, ते ते ह्या अवकाशात साठवालं जातं. म्हणूनच प्रत्येकाच अवकाश वेगळ असतं. दोन व्यक्तिंसाठी एका गोष्टचं महत्व कधीच एकसारख नसतं, आणि म्हणूनच त्यांनी स्वतःसाठी बांधलेल जगहि कधीच सारख नसतं. आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं, आपण ते त्या अवकाशत, आपल्याला हवं तसं बसवतो. तिथे कोणी आपल्याला चुक किंवा बरोबर म्हणणार नसतं. आणि म्हणूनच कदाचित काही लोक त्या अवकाशत जास्त रमतात. तिथे आपण आपण असतो, बाहेरच्या जगतल्या प्रत्येक बदलाने बदलणारे, तरीपणं स्वःत्व  जपणारे…