ओळख

​आपल्याला बोलायला ओळख लागते. ओळख वेगळी वेगळी असू शकते, कधी व्यक्तिशी तर कधी मुद्दयांशी. दोन माणसं जेह्वा भेटतात, तेह्वा ओळख शोधतात. काहीतरी साधर्म्य शोधतात. कारण आपल्याला अनोळखी गोष्टिंची, माणसांची भीति असते. ओळखीच्या ठिकाणी जायला तेवढी भीति नाही वाटत. तसाच काहितरी अनोळखी व्यक्तिशी बोलताना होत. जेह्वा एक ओळखीचा धागा सापडतो, तेह्वा त्या व्यक्तीची भीति कमी होते आणि संवादाला सुरवात होते. अर्थात बोलणं ओळखीला धरुनच असतं. त्या धाग्याला धरुन आपण पुढे जातो आणि जाळे विणायचा प्रयत्न करतो. म्हणूनच कदाचित, विचार ज्या व्यक्तिशी जुळतात ते आपल्याला जास्त जवळचे वाटतातं. कारण त्यांच्या विचारांचे सगळे धागे आपल्याला माहित असतात. 

ज्या लोकांशी विचार जुळत नाही, त्या लोकांच आपण जास्त ऐकूनपण घेऊ शकतं नाही. एक भीति असते, आपल्याला आपला comfort zone सोडावा लागेल, आणि त्याच्याहून जास्त भीति असते की, त्या comfort zone च्या बाहेर आपल्याला जास्त आवडेल. स्वतःच अस्तित्व त्या comfort zone ने आपणच ठरवलेल असतं  आणि जर तोच सोडला तर अस्तित्वालापण धक्का लागतो. अर्थात स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःहुन धोक्यात घालण सगळ्यांना जमातच अस नाही.

Advertisements